Happenings

वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुध्द गुन्हा दाखल

रस्त्याच्या मधोमध काळीपिवळी जीप उभी करुन वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हर्सुल टी बसस्टॉपसमोर काळीपिवळी जीप एमएच २० बी टी ५८९१ चा चालक जावेद महेबुब पठाण, वाहन क्रमांक . एम एच २० ए ए ५०५५ चा चालक प्रशांत काशीनाथ साळवे या दोघांनी जीप रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या होत्या. त्यावरुन हर्सुल पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार कोतकर करत आहेत.

Related Articles

Close