In Short

डॉ. प्रियंका रेड्डींच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, एमआयएमचा नगरसेविकांन केली मागणी 

हैदराबाद तेलंगणा येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांचे अपहरण करून सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्या नराधमांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मजलीसे इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) च्या नगरसेविका सरवत बेगम आरेफ हुसैनी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तांच्या मार्फेत देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी (दि.३०) निवेदन पाठविण्यात आले. निवेदनानुसार, देशाच्या माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेला आवाहन देणारी आहे. त्यामुळे सर्व आरोपींचा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पुढील काळात अशा प्रकारच्या निंदनिय घटनांची पुनरावृत्ती होवू नयेे म्हणून सामुहिक बलात्कार व हत्या करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी. तसेच कायद्यात कठोर शिक्षेची नवीन तरतुद करण्यात यावी. डॉ. प्रियंका रेड्डी यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर नगरसेविका सरवत आरिफ हुसैनी, महानगरपालिका विरोधी पक्षनेता सरिता बोर्डे, जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, नगरसेविका नरगीस शेख सलीम, सायरा बानो खान, नगरसेवक अब्दुल रहीम नाईकवाडी, नासेर सिद्दीकी, अबुल हसन हाश्मी, फिरोज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Close