In Short

डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थेव्दारा जनजागृती मोहिम

शहरामध्ये झपाट्याने वाढणा-या डेंग्यु या आजारावर समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने कमला नेहरु पॉलिटेकनिक (फार्मसी ),डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस,औरंगाबाद व वैद्यकिय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग-हर्षनगर औरंगाबाद यांच्या विद्यमाने जनजागृती माेहिम राबवली गेली. औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये, कमला नेहरु पॉलिटेकनिक (फार्मसी ) अनुदानित व विना अनुदानित घटाकांच्या प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन डेंग्यु या झपाट्याने वाढणा-या आजारावर अबेट ट्रिटमेन्टव्दारा कशाप्रकारे प्रतिबंध लावता येतो व सदर साथीस कशाप्रकारे अटकाव करता याबाबत विविध वस्त्यांमध्ये जाऊन जनसामान्यामध्य जनजागृती करुन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिके करुन दाखविली. याकामी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे डॉ.गालिब हुंडेकरी,प्राचार्य व विना अनुदानित घटाकाच्या अधिव्याख्याता सयदा शहाना,सय्यद अदिल कादरी, मोहंमद सादेक या मान्यवरांचे तथा वैद्यकिय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग-हर्षनगर औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात संस्थेचे शेख रियाज,शेख जबी,शेख अजीम,सिराज पटेल व इतरांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Close