थ्री मॉन्क्स मिडीया हाऊसविषयी

मराठी पत्रकारीतेच्या कक्षा रूंदावण्यासाठी थ्री मॉन्क्स मिडीया हाऊसची स्थापना झाली आहे. एखादी घटना घडल्यावर ती सोशल मिडीयावर लगेच व्हायरल होणे आता नविन नाही. मात्र, त्या घटनेमागचे नेमके कारण केवळ पत्रकारच देऊ शकतात. थ्री मॉन्क्स मिडीया हाऊस महाराष्ट्रातील अत्यंत अनुभवी आणि आपल्या कामाचा ठसा उमटवलेल्या पत्रकारांचे व्यासपीठ आहे. यात मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजी पत्रकारीतेचा दोन दशकाहून अधिक अनुभव असणाऱ्या पत्रकारांचा समावेश आहे. यामुळेच थ्री मॉन्क्स मिडीया हाऊसच्या बातमीचा निकष फक्त विश्वासहर्ता, विश्वासहर्ता आणि विश्वासहर्ताच आहे. उत्तर भारतातील काही प्रमुख शहरातील न्यूज पोर्टलनंतर आता थ्री मॉन्क्स मिडीया हाऊस महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी न्यूज पोर्टल घेऊन हजर झाले आहे.

MH20 NEWS विषयी

MH20 NEWS हे थ्री मॉन्क्स मिडीया हाऊसचे औरंगाबाद शहरासाठी वाहिलेले मराठीतील पहिले न्यूज पोर्टल आहे. वृत्त वाहिन्यांची वाढलेली गर्दी आणि सोशल मिडीयाच्या मायाजाळात आज जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना आपल्याला दुसऱ्या क्षणाला समजते. दिल्लीपासून डब्लीन आणि मुंबईपासून मेलबॉर्नपर्यंतच्या घटनांचा क्षणाक्षाचा तपशील या ना त्या मार्गाने आपल्याला समजतो. मात्र, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, अगदी आपल्या गल्लीत, शेजारील इमारतीत काय घडलेय, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्रांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी, आजच्या घटना आजच आपल्यापर्यंत पत्रकारीतेच्या अंगाने पोहचवण्यासाठी MH20 NEWS सज्ज झाली आहे.

राजकरणापासून समाजकरणापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, गुन्हेगारी विश्वापासून प्रशासनापर्यंत, उद्योगापासून पर्यटनापर्यंत, संस्कृतीपासून साहित्यापर्यंत शहराशी संबधीत प्रत्येक घडामोडीची पहिली बातमी MH20 NEWS वरच मिळेल, अशा प्रभावशाली पत्रकारांचे नेटवर्क आमच्याकडे आहे. टेक्स, पिक्चर, ऑडीओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला शहरात सर्वात पुढे ठेवण्याचा प्रयत्न करू. सोबतीला आमच्या विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय ब्युरोकडून मराठवाडा, महाराष्ट, देश आणि परदेशातील महत्वाच्या बातम्याही आपल्याला या ठिकाणीच मिळतील. आज घडलेल्या बातमीसाठी आता आपल्याला उद्याचा पेपर वाचण्याची गरज भासणार नाही. आपल्या मोबाईल फोनवर, लॅपटॉप आणि संणकावर आपल्याला दुसऱ्या क्षणाला ही बातमी समजू शकेल.