Breaking News

..आणि त्याने शिवसेनेला सत्ता मिळाल्यावरच केली दाढी

जाेपर्यंत शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी आगळीवेगळी शपथ एका सच्च्या शिवसैनिकाने घेतली होती. शिवसेनेला सत्ता मिळाल्यावरच त्याने दाढी केली. रेल्वे स्टेशन हमालवाडा येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख हर्षवर्धन त्रिभुवन असे या शिवसैनिकाचे नाव आहे. एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन हेड म्हणून हे काम करतात.
मी बालवयात होतो तेव्हा पासून शिवसेनेसोबत आहे. तीन वर्षांपासून मी निश्चय केला होता की जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल  तेव्हाच मी क्लीन शेव (दाढी) करेल. तोपर्यंत मी दाढीला वस्तरा देखील लावला नाही. तीन वर्षांनी आज मी दाढी करत आहे. अनेकांनी माझी मजा उडवली, घरातील मंडळी देखील मला याबाबत बोलत होते परंतु मी माझा निश्चय मोडला नाही. जेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाले. उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवतीलच परंतु सामान्य माणसांच्या अडचणी देखील ते साेडवतील असा विश्वास या सच्च्या शिवसैनिकाला आहे.
आपल्या पक्षाप्रती एवढी निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते तुरळकच पाहायला मिळतात त्यातीलच हा एक शिवसैनिक म्हणावा लागेल.

Related Articles

Close