Breaking News
मिटमिट्यात होणार सफारी पार्क
महापालिकेने मिटमिटा भागात शंभर एकरात १४५ कोटी रूपये खर्च करून सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे डीपीआर मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या डीपीआरला अठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. महापालिका व डीपीआर तयार करणाऱ्या दिल्लीच्या एजन्सीने नुकतीच चुकांची दुरूस्ती केली. त्यामुळे सफारी पार्क चा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय वादात सापडले होते. प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, चुकीच्या पध्दतीने केलेली पिंजऱ्याची मांडणी, मास्टर प्लॅनकडे महापालिकेचे झालेले दुर्लक्ष यामुळे केंद्रिय प्राणिसंग्रहालय संचालनालयाने प्राणिसंग्रहालयाची मंजुरी रद्द केली होती. महापालिका पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन लोकप्रतिनीधी, आयुक्तांनी दिल्लीत आपली बाजू मांडली. त्यानंतर सफारी पार्कचे काम तातडीने सुरू करण्याच्या अटीवर प्राणिसंग्रहालयाला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली