In Short
औरंगाबादेत आरटीओ कार्यालयातर्फे काढण्यात आली जनगजागरण फेरी
रस्ते सुरक्षा जनजागृतीचा भाग म्हणून आरटीओ कार्यालयातर्फे शनिवार (दि.३०) शहरातून जनगजागरण फेरी काढण्यात आली. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने वाहनांनीही या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. सकाळी आठ वाजता निघालेली रॅली साडेनऊ वाजे दरम्यान आरटीआे कार्यालयात पोहोचली. त्यावेळी श्रीकृष्ण नकाते आणि स्वप्निल माने यांनी उपस्थितांन रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
आरटीओ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूनक पोलिस आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शहरातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरीक या रॅलीत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पेालिस उपायुक्त मीना मकवाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे, एमआयटी कॉलेज चे प्राचार्य कुलकर्णी, प्रशांत अवसरमल, राहुल अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक दमगीर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, शहरातील विविध नामवंत संस्था या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीओच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.