Happenings

चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट कारने चौघांना उडवले

चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट वेगातील कारने चौघांना उडवले. गुरूवारी रात्री (ता. २८) मदनी चौक ते रोशनगेट या रस्त्यावर ही घटना घडली. या सुसाट कारने रस्त्यावरील काही वाहनांना देखील उडवले. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.  गुरूवारी रात्री १०.३० ते १०.४५ दरम्यान टक्सी कारच्या (एमएच-२० ईजी -७७६६) चालकाचा मदनी चौकाजवळील हॉटेल दरबारसमोर ताबा सुटला. पुढे काही अंतरावर जाईपर्यंत त्याने तीन ते चार पादचाऱ्यांना उडवले. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या काही वाहनांना धडक दिली. पुढे जाऊन कार रोशनगेटच्या अलीकडील हॉटेलच्या पायऱ्यांवर जाऊन धडकली. जखमींना तात्काळ जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. कारचेही नुकसान झाले होते. जिन्सी पोलिसांना घटनास्थळी जमा झालेल्या बघ्यांची गर्दी पांगवली.

Related Articles

Close