Happenings

भावाला दुचाकीवरून का पाडले असा जाब विचारत डॉक्टरला मारहाण

एमजीएम परिसरातील घटना

भावाला दुचाकीवारून का पाडले असा जाब विचाारत एका डॉक्टराला शिविगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली़. हा प्रकार एमजीएम परिसरातील गेट क्रमांक एक जवळ बुधवारी २६ नोव्हेंर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला़. या मारहाणीत डॉ़ प्रखर प्रताप सिंग हे जख्मी झाले आहे़ या प्रकरणी जखमी डॉक्टर प्रखर सिंग यांच्या फिर्यादी वरून तीन तरुणांविरुध्द सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. प्रखर हे मीत्रा सोबत गप्पा मारत उभे असतांना संशयित किरण ठाकुर, राहुल येवले त्यांचा एक साथीदार तेथे आला. किरणने, दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या भावाला दुचाकीवरुन का पाडले असे म्हणत डॉक्टर प्रखरकडे पैशांची मागणी केली. त्यावर प्रखर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता तिघांनी प्रखरला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच किरण ठाकुर याने हातात असलेल्या तिक्ष्ण हत्याराने यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास जमादार राठोड करत आहेत.

Related Articles

Close