Happenings

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन ठाकरे पाळतील असा विश्वास

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरूवारी शिवतीर्थावर पार पडलेल्या उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावली. यासाठी बुधवारी सायंकाळीच शेतकऱ्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास असून ठाकरे तो शब्द पाळतील असे वाटते आहे.
शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व काही कार्यकर्त्यांनी देखील बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. शिवसैनिाकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणाऱ्या सरकारकडून त्यांनाही अपेक्षा आहेत. शिवाय ठाकरे कुटूंबियांतून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषविले जाणार आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पहायला मिळाले. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येईल, यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येईल. सिल्लोड, पैठण, फुलंब्रीतील शेतकऱ्यांनी स्वत:हून मुंबईला शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तयारी केली आणि उत्स्फुर्तपणे ते मुंबईसाठी रवाना झाले.

Related Articles

Close