Happenings

एमआयएमचे नगरसेवक हाश्मी यांचे बेशरम चे झाड मनपाला देवूून आंदोलन

कचरा प्रश्नासाठी गांधीगिरी वापरून अनोखा प्रयोग

काही दिवसां पुर्वी एमआयएमचे नगरसेवक अबुल हाश्मी यांनी कचरा प्रश्नी  कचरा संंकलन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.  परंतू कचरा संकलन करून सेंट्रल नाक्यावर ठेवण्याच्या कारणावरून हाश्मी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे वारंवार फोन करूनही उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी नंदकिशोर भोंबे यांना बेशरमचे झाड देण्यासाठी त्यांचा कक्ष गाठला.
शहरात कचराप्रश्न बिकट होत आहे. परिणामी शहरात साथीचे रोग पसरत आहेत, दिवसेंदिवस नागरिकांचे आरोग्य धाेक्यात येत आहे. महानगर पालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. असे असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख भोंबे गायब आहेत. वारंवार संपर्क साधल्यानंतरही ते उपलब्ध होत नसल्यामुळे मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी  संध्याकाळी  एमआयएम पक्षाचे नगरसेवक अबुल हसन अली हाश्मी यांनी भोंबे यांच्या कार्यालयात बेशरामचे झाड ठेवून गांधीगिरी करून अनोखे आंदोलन केले. यावेळी सईद फारुकी, दीपक निकाळजे यांची उपस्थिती होती.
सत्कारासाठी शाल हार सह बेशरमाचे झाड
हाश्मी यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी शाल, हार, व पुष्पगुच्छ ऐवजी बेशरमचे झाड हातात घेऊन घनकचरा अधिकाऱ्यांच्या दालना जवळ गेले. तेव्हा त्या दालनात अधिकारी उपलब्ध नव्हते. तसेच त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांना आत जाण्यास थांबवले.

Related Articles

Close