Breaking News

शिवाजीनगर परिसरात तीन घरफोड्या, हजारोंचा ऐवज लंपास

गारखेडा परिसरातील शिवाजीनगरात चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकूळ घातला आहे. चाेरट्यांनी घरफोडी करून हजारो किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. या खळबळजनक घटनेमुळे शिवाजीनगर परिसरातील रहिवाश्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार , घटना पहिली:
शिवाजी लक्ष्मण बरडे (वय २९, रा.शिवाजीनगर) हे घराला कुलूप लावून २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी शिवाजी बरडे यांच्या घराचे कुलूप तोडून किचनमधील कपाटातून सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण ६ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

घटना दुसरी :
गोपाल बंकटलाल काबरा (वय ४२,रा.शिवाजीनगर) हे घराला कुलूप लावून ३१ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी गोपाल काबरा यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडले. चोरट्यांनी कपाटातून चांदीचे दागीने, किंमती कपडे, सिंगापूर आणि नेपाळ या देशाचे चलन असा एकूण जवळपास १० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

घटना तिसरी :
अनिल जनार्दन चव्हाण (वय ३४, रा.शिवाजीनगर) हे घराला कुलूप लावून २७ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण ९ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
शिवाजीनगर भागात झालेल्या एकामागे एक अशा तीन घरफोड्यांमुळे या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यची मागणी रहीवाश्यांकडून केली जाता अाहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Close