Happenings

चोरट्याने केली दुचाकी लंपास

गजानननगर भागात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. २ नोव्हेंबर रोजी गारखेडा परिसरातील रहिवाशी उमेश चिमासाहेब भोसले यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच २१ बी सी २६०५ ही घरासमोर उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. उमेश भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास हवालदार हिंगे करत आहे.

Related Articles

Close