Happenings
जागतिक बौध्द धम्म परिषदेचे उद्घाटन
पीईएसच्या क्रिडांगणावर तीन दिवसीय जागतिक बौध्द धम्म परिषदेला शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) साडेपाच वाजता सुरूवात झाली. अखिल भारतीय भाक्खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक डॉ. वरकगोडा धम्मसिध्दी, भदन्त बोधिपाले, सारनाथचे भदन्त चंदिमा, नेपाळचे भदन्त मैत्री महाथेरो, लडाखचे भदन्त संघदेसना, श्रीलंका भदन्त शिवली, साऊथ कोरीया भदन्त वॉनसन, भदन्त प्रधामबोधिवॉग, थायलंडचे भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना, कम्बोडीया भदन्त पीच सेम यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन झाले.
प्रारंभी जागतिक बौध्द धम्म परिषदेवर रोजाना व्हेनीच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्प वृष्टी केली. दरम्यान सामुहिक वंदनेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. भिक्खू संघाने सामूहिक वंदना करत परिषदेचे उद्घाटन पार पडले. यावेळी तथागत गौतम बुध्द व डॉ. बााबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी १५ देशांतून आलेल्या विविध भिक्खू संघाला समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील सामूहिक याचना झाली. यावेळी डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिध्दी यंनी परिषदेची सुरूवात झाल्याचे साडेसहा वाजता जाहीर केले. डॉ. तेंग झिंग ताय हे दलाई लामा यांचे प्रतिनिधी यांनी बुध्द धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगून जीवधारी प्राणी सुखी व्हावे. मी परका ही भावन नष्ट हाेवो सर्व विचारधारा एक हो अशी मंगल कामना केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, दलाई लामा यांच्यासह आपण सर्व बुध्दधम्म मानत असून बुध्दाचा प्रेम करूनेचा संदेश सर्व पाळूया. मैत्री भाव कायम ठेवूया. प्रत्येकाचा आभ्यास कोणताही असो, पण सर्वांप्रती मैत्री स्थापन होण्याची गरज आहे. भारतीय प्राचीन चिकित्सा, विद्या मनोविज्ञानाचा प्रसार गरजेचा असून, जगाला त्याचा लाभ मिळावा. सर्व जगात साेबत राहणे गरजेचे असतांना पर्यावरणाची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.