Happenings
मोलकरणीने केली सोन्याची लग्गड लंपास
मोलकरणीने जवळपास ९२ हजार रूपये किंमतीची सोन्याची लग्गड लंपास केली. प्राप्त माहितीनुसार, अमोल अरूण पवार (वय २८, रा.मुकुंदवाडी परिसर) यांचे मुकुंदवाडी परिसरात सोने-चांदीचे दुकान आहे. अमोल पवार यांनी त्यांच्याकडे असलेले दागिने १० नोव्हेंबर रोजी वितळवून त्याची लग्गड तयार करून आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवली होती. ११ नोव्हेंबर रोजी अमोल पवार यांच्या पत्नीने सदरील पॅन्ट धुण्यास टाकली होती. त्यावेळी अनुसया भोसले (वय ४५, रा.मुकुंदवाडी परिसर) यांनी पवार यांच्या पॅन्टच्या खिशातील सोन्याची लग्गड चोरून नेली. अमोल पवार यांनी भोसले यांना याबाबत विचारले असता अनुसया भोसले यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी कामास येणे बंद केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार गोरे करत आहेत