Breaking News

औरंगाबादच्या विकासासाठी जेवढा निधी पाहिजे तो मी शासनाकडून आणणार – खासदार इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांची सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आढावा बैठक

खासदार इम्तियाज जलील यांची ८ नाेव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. यात विविध विषयावर चर्चा झाली. खासदार जलिल यांनी औरंगाबाद शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी चर्चा केली. ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढा निधी पाहिजे तो निधी मी शासनाकडून घेवून येणार, अधिकाऱ्यानी नविन प्रस्ताव लवकरात लवकर तयार करुन द्यावा. अशा सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशा सर्व कंत्राटदारावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना खासदार जलिल यांनी  बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच आज पर्यंत बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्यां सर्व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनेअंतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली.

सर्व शासकीय कार्यालय, कोर्ट, इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा
बैठकती औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे. ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा केली. तसेच औरंगाबाद मध्ये असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्यां सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी. जेणे करुन तेथे येणाऱ्यां रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांची ही दुरुस्ती करण्यात यावी.

या बैठकीमध्ये  सु.गो.देशपांडे (अधीक्षक अभियंता), एस.एस.भगत (कार्यकारी अभियंता), .वाय.बी. कुलकर्णी (कार्यकारी अभियंता, पश्चिम विभाग), एन.बी. भंडे (कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प विभाग), ए.वाय. येरेकर (उपविभागीय अभियंता, दक्षिण उपविभाग), कदिर अहेमद (उपविभागीय अभियंता, इमारती), सर्व उपविभागीय अभियंता एस.बी. बिरारे (विशेष प्रकल्प), एस.जी.केंद्रे (खुलताबाद),पी.टी. सोनकांबळे (कन्नड), जे.एम. जाधव (कन्नड),  बी.एन. चव्हाण (वैजापुर), श्री.एच.के. ठाकुर (गंगापूर), एन.के. गायकवाड (गंगापूर), जागतिक बँक प्रकल्प विभागाचे सर्व उपविभागीय अभियंता, एम.टी क्षिरसागर,  एस.डी. म्हैसेकर, एन.एम. सुर्यवंशी,  आर.आर. खंडेवाल, आर.पी. तोंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

Close