Breaking News
जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीनाताई शेळके
भाजपचे लहानु गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी भाजपचे लहानु गायकवाड यांची निवड झाली. शुक्रवार आणि आजचा शनिवार या दोन दिवसीय राजनाट्यानंतर अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक पार पडली. शुक्रवारचा राडा आणि आज अब्दुल सत्तार यांचे राजीनामास्त्र आणि त्यामुळे राजकीय घडामोडीत उडालेली खळबळ, एवढे रंजक राजनाट्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान पहावयास मिळाले. या घडामोडी अंती काँग्रेसला अध्यक्षपद तर भाजप ला उपाध्यक्षपद मिळाले. अध्यक्षपदासाठी मीना शेळके आणि शिवसेना बंडखोर आणि भाजप पुरस्कृत देवयानी डोणगांवकर यांना ३०-३० अशी समान मतं मिळाली. पण चिठ्ठी काढून काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या गायकवाड यांना ३२ तर महाविकास आघाडीच्या शुभांगी काजे यांना २८ मतं मिळाली आहेत.