In Short

‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’ च्या गजरात इस्कॉन रथयात्रा महोत्सव उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) सिडको एन-१ शाखेच्या वतीने रविवार दि.१९ जानेवारी ला भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही रथयात्रा संस्थान गणपती मंदिरापासून दुपारी १ वाजता सुरु होऊन गांधीपुतळा-सिटी चौक – गुलमंडी – गोमटेश मार्केट – पैठण गेट – औरंगपुरा सिग्नल– निराला बाजार– एम.पी. लॉ कॉलेज – नागेश्वर वाडी मार्गे खडकेश्वर मंदिर मैदानावर संपन्न झाली. भगवान श्री श्री गौर-निताई यांना भोगअर्पण केल्यानंतर आरती करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रथयात्रा मार्गाची झाडू मारून स्वच्छता करण्यात आली. “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामहरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राच्या गजरात रथयात्रेस सुरुवात झाली. रथयात्रा मार्गावर सुंदर रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती.
या रथयात्रेस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक बंडू ओक, नगरसेवक सचिन खैरे, अनिल मकरीये यांची प्रमुख उपस्तिथी होती. पंडाल मध्ये अध्यामिक साहित्य व बुक स्टाॅल, इस्कॉन युवा मंच, प्रश्नोत्तरे, गोपाल फन स्कुल असे विविध स्टाॅल विनामुल्य मार्गदर्शन करत होते. गोविंदा’ज स्टाॅल खवय्यांच्या गर्दीने गजबजला होता. इस्कॉन च्या भव्य“ग्लोरी ऑफ डेक्कन” निर्माणाधीन मंदिर प्रोजेक्ट ची प्रतिकृतीसर्वांना आकर्षित करत होती.

Related Articles

Close