In Short
गतिमंद मुलीच्या प्रकरणातील आरोपींना कठारे शासन व्हावे
सजग महिला संघर्ष समिती व औरंगाबाद कनेक्ट टीम च्यावतीने निवेदनातून केली मागणी
वळदगाव शिवारातील विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या बसमध्ये गतिमंद मुलीचा बसचालक व त्यांच्या दोन मित्रांकडून विनयभंग करण्यात आला. या वर्तनाची व्हिडिओ क्लिप आरोपीने आपल्या व्हाटॅसअपच्या स्टेटसवर ठेवली त्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे, न्यायालयात लवकरात लवकर खटला उभा राहावा.या मागणीचे निवेदन शहरातील सजग महिलां संघर्ष समिती व औरंगाबाद कनेक्ट टीम च्या वतीने सातारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विठ्ठल पोटे यांना देण्यात आले.
यावेळी घडलेल्या गुन्ह्यांबाबत आणि लावण्यात आलेल्या कलमांबाबत तसेच तपासाबद्दल पोटे यांनी माहिती दिली. व आरोपीनां कठोर शासन करण्यात येईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. चारुलता रोजेकर, डॉ. मंजूषा शेरकर, आरतीश्यामल जोशी, निलिमा देशपांडे, प्रा.भारती भांडेकर, सारंग टाकळकर, अड.अक्षय बाहेती, चेतन पगारे, अभिषेक कादी यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक अनिता कसारे यांची उपस्थिती होती.