Happenings

‘खाकी’ उपहारगृहाचे व ‘मध्यवर्ती निगराणी यंत्रणा’ कक्षाचे उद्घाटन

पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अद्ययावत तयार करण्यात आलेल्या ‘खाकी’ या उपहारगृहाचे व ‘मध्यवर्ती निगराणी यंत्रणा कक्षा’ चे सोमवारी (१३ जानेवारी) रोजी सकाळी ११.०० वाजता विशेष पेालिस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सिंगल यांनी मध्यवर्ती निगराणी यंत्रणा कक्षाची पाहणी करून होणाऱ्या कामाची माहिती करून घेतली. तांत्रिक विश्लेषन यंत्रणाच्या माध्यमातून पोलिसांना असामाजिकत्व व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्याविरूध्द तात्काळ कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे महत्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यास व त्यातील आरोपी पर्यंत पोहचणे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक जलद गतीने शक्य होणार आहे.
त्याचप्रमाणे, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून खाकी या उपहारगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपहारगृहाच्या माध्यमातून सर्वांना माफक दरामध्ये स्वच्छ, चांगले व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहे. तसेच या उपहारगृहात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामाध्यमातून नागरीकांना, कार्यालयीन कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांना दुपारचा डब्बा खाण्यासाठी,जेवणासाठी स्वच्छ जागा उपलब्ध झाली आहे.
गणेश गावडे अपर पोलिस अधीक्षक , विवेक सराफ उपअधीक्षक, भागवत फुंदे पोलिस निरीक्षक, सहा. पोनि. गणेश सुरवसे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Close