शिवसेना
मयुर पार्काच्या पाठीमागे असलेल्या रामचंद्र नगरात युवा सेनेच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अमोल किर्तीकर, चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकूमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवात युवतींना आणि महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. पतंग हा मुलांचा हा खेळ समजला जातो. शिवाय महिला असुरक्षिततेची भावना आहे. ही भावना तरुणींच्या मनात राहू नये. यासाठी या महोत्सवात महिलांनी सहभागी करुन घेतल्याचे युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी नारायण सुरे यांनी सांगितले या माध्यमातून तरुणींचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न होता असेही सुरे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बन्सी जाधव, सिमा खरात, सचिन खैरे, ऋषीकेश खैरे, मोहन मेघावाले, ऋषीकेष जैस्वाल, युवती सेनेची जिल्हा प्रमुख डॉ. अश्विनी जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. टिव्ही सेंटर येथील मैदानावर शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी वाटण्यात आलेल्या पतंगावर आपले सरकार ठाकरे सरकार असे लिहलेले होते. हे ठाकरे सरकार सर्व सामान्याच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार आहे. असा विश्वास यावेळी शिवसेना नेत्यांनी लोकांना दिला. या महोत्सवाला देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
–
भाजप
भारतीय जनता पक्षाचे नेते व आ.अतुलजी मोरेश्वर सावे यांच्या नेतृत्वाखाली एन 7 येथील रामलीला मैदानात गणेश नावंदर यांनी पतंग मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुले व पुरूषांना पतंग उडवून साजरा करण्याची आपली परंपरा आहे हिच परंपरा कायम ठेवत गेल्या चार वषाँ पासून गणेश नावंदर एन 7 येथील रामलीला मैदानात अशा प्रकारच्या पतंग मोहत्सवाचे आयोजन करतात.यावेळी आ.अतुल सावे यांनी ऊपस्थित पदाधिकारी व नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व सर्व ना पतंग वाटप करत स्वतः देखील पतंग उडवण्याचा आनंद घेतला.
यावेळी आ.अतुलजी मोरेश्वर सावे, डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरूळे अप्पा,भाजप चे प्रदेश सदस्य अनिलभैय्या मकरिये, बापु घडामोडे, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेवक दिलीप थोरात, प्रशांत देसरडा,काशीनाथ कोकाटे, गणेश नावंदर, अरूण पालवे, विलास कोरडे,बालाजी मुंडे, गारखेडा मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, श्रीनिवास देव,तेजस व्यवहारे,विकास कुलकर्णी, विकास पाटील विवेक राठोड, नितीन खरात, सतीश खेडकर,राहुल खरात,अरूण राऊत, हुशारसिंह चव्हाण, पारटकर काका, बालाजी मुंडे, भाऊसाहेब टिके, आनंद बोरकर, रवी पाठक, प्रदिप ठाकरे, नारायण अन्ना,ज्ञानेश्वर वेळनकर,सचीन भोसले,अजय गिरी, राजू कटोरे,सचीन दहीवाल,काळेकाका,गोरख पठारे,वाडेकर पाटील, ब्रिजलाल जैस्वाल, सचिन दहिवाल, शाम बांगड, अजित परभणे, नितीन राऊत, दिवान सर, सागर वडगावक, रवी ऊबाळे, कैलास डिघोळे, संतोष प्रधान, हषँल चिंचोलकर गंगाराम जावळे,गौतम साळवे, रमेश जवळकर, विजयसिंह झाला, अशोक दहिहंडे, नितीन खरात, रामेश्वर दसपुते, अरूण राऊत, अजुँन गवारे, यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. समर्थ नगरात भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अनिल मकरीये यांच्या निवासस्थानी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अतुल सावे यांच्यासह शहरातील भाजपचे पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली होती. पंतग उडवण्या बरोबरच हुर्डा पार्टीचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय गप्पा देखील चांगल्याच रंगल्या होत्या.
–