Happenings

महिलांनी डिजिटल साक्षर होण्याची नितांत गरज

पेालिस आयुक्तालयात सायबर सेफ वुमन कार्यक्रमात पोलिसांची माहिती

सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. सुशिक्षित महिलांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, त्याचबरोबर आता महिला, तरूणींनी तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस होणारे बदल समजून घेणे आवश्यक असून डिजिटल साक्षर होण्यचाी नितांत गरज आहे, असे मत पोलिस अधिकारी व मान्यवरांनी व्यक्त कले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून पेालिस स्थापाना दिनानिमित्ताने पोलिस आयुक्तालयातर्फे शुक्रवारी सायबर सेफ वुमन या विषयावर महिला व मुलींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनेटचे जाळे सर्वत्र पसरल्यानंतर त्यात सायबर गुन्ह्यांचा सर्वाधिक धोका वाढला आहे. त्यात बहुतांश वेळेला महिलांना लक्ष केले जाते. ऑनलाईन फसवणूक , सोशल मिडीयाचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या धर्तीवर आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील महीला, सरकारी कर्मचाऱ्यांसह महिला दक्षता समितीच्या सभासद व गीता मंदीर प्रशालेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, अतुल सावे , संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती विकास जैन, पृथ्वीराज पवार, माजी महापौर रशीद मामू, अण्णा वैद्य यांची उपस्थिती होती.

शहरात महिलांसाठी जनजागृती कार्यशाळा
या कार्यक्रमाचे सर्वच प्रमुख मान्यवरांनी महिलांविषयी सायबर गुन्ह्याबाबत चिंता व्यक्त केली. शहरात पेालिसांनी विविध ठिकाणी जाऊन त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी केली. त्यावर लवकरच शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याचे आश्वासन पेालिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले. कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक संतोष पाटील, कैलास देशमाने, सहाय्यक निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक सविता तांबे, स्नेहा करेवाड, मीरा लाड, निर्मला निंभोरे, यांच्यासह विशेष शाखा, सायबर गुन्हे शाखेने विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Close