Today's Special

२१ ऑगस्ट- आजच्या दिवशी विनोदी कलाकार शरद तळवळकर यांनी घेतला जगाचा निरोप.

२१ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : बुधवार(बुधपूजन)

सुर्योदय : ०६.२१

सुर्यास्त : १९.०२

नक्षत्र : पु. अश्विनी

तिथी : कृ. शष्ठी

२१ ऑगस्ट दिनविशेष

आजच्या दिवशी विनोदी कलाकार शरद तळवळकर यांनी घेतला जगाचा निरोप.

शरद तळवलकर (नोव्हेंबर १, १९१८ – ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै. शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले.
पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.

मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहर्‍याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणार्‍या ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.

२१ ऑगस्ट – इतर दिनविशेष

१९९३ : मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.
१९९१ : लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१८८८ : विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.
१९८६ : उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू
१९६१ : व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज
१९२४ : श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू: ३०एप्रिल २००१)
१९३४ : सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (मृत्यू: १० मे २००१)
१९१० : नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९०९ : नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी (मृत्यू: १० मे २०००)
१८७१ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
१७८९ : ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ (मृत्यू: २३ मे १८५७)
१७६५ : विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २० जून १८३७)
२००६ : बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (जन्म: २१ मार्च १९१६)
२००१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१ : मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर (जन्म: ? ? ????)
२००० : विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
२००० : निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्‍नुषा (जन्म: ? ????)
१९९५ : सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. (जन्म: १९ आक्टोबर १९१०)
१९९१ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (जन्म: २० एप्रिल १९१४)
१९८१ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद,
१९७८ : विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९७७ : प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू
१९७६ : पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer),
१९४० : लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९३१ : ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

Related Articles

Close