Today's Special

५ सप्टेंबर- आज शिक्षक दिन

५ सप्टेंबर २०१९ दिनविशेष

वार : गुरुवार(शुभ दिवस सायं ६.३६ ते रात्रौ ८.४९ प.  )

सुर्योदय : ०६.२४

सुर्यास्त : १८.५१

नक्षत्र : अनुराधा

तिथी : शु. सप्तमी

५ सप्टेंबर दिनविशेष

आज शिक्षक दिन

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.

आज ज्येष्ठ गौरी आवाहन

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते.   यावेळी ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त  दिवसभर आहे.

५ सप्टेंबर- इतर दिनविशेष

२००५ : इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
२००० : ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर
१९६७ : ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.
१९४१ : इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९३२ : फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.
१९४० : रॅक्‍वेल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री
१९२८ : दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)
१९२० : लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)
१९०७ : जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)
१८९५ : अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत ’दमयंती स्वयंवर’ व मुक्तेश्वरकृत ’महाभारताचे आदिपर्व’ हे उल्लेखनीय आहेत. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१६३८ : लुई (चौदावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)
११८७ : लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)
२००० : रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)
१९९५ : सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
१९९२ : अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: ? ? ????)
१९९७ : मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)
१९९१ : शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१)
१९७८ : रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. ’रात्र’ आणि ’उत्तररात्र’ हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. मुंबई आकाशवाणीवरील ’वार्‍यावरची वरात’ व ’मेघदूत’ या श्राव्य नियतकालिकांचे ते निर्माते व लेखक होते. (जन्म: ? ? १९०८)
१९१८ : सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१)
१९०६ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

 

Related Articles

Close