In Short

टी-20 क्रिकेट संघात शुभम कोठेकरची निवड

देवळाई परिसरात राहणारा शुभम कोठेकर या तरुणाची टी 20 क्रिकेट संघात निवड झाली आहे. जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शुभमने टी 20 संघात स्थान मिळविले. ऑक्टोबर 2019 मध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर टी 20 संघ निवडीसाठी सराव घेण्यात आले. यात शुभमची निवड झाली. या यशाबद्दल देवळाई परिसर व कुटुंबाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. एप्रिल 2020 मध्ये गाेवा गोल्ड कपसाठी शुभम हा महाराष्ट्र टी 20 संघात खेळणार आहे. टी 20 संघात स्थान मिळविणारा शुभम हा जिल्ह्यातला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याला प्रशिक्षक अक्षय पाराशर याचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

Related Articles

Close