Breaking News

भागवत कराड यांच्या घरावर हल्ला

हल्ला राजकीय असल्याचा भागवत कराड यांचा आरोप

नुकतेच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी माझ्या घरावर हल्ला केला असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. भागवत कराड यांनी केला अाहे. या घटनेनंतर शहरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी हे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. ते म्हणाले शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजता ते त्यांच्या समता नगर येथील घरातील हॉस्पिटल मध्ये नगरसेवक रामेश्वर भादवे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते. त्यावेळी रंगनाथ राठोड भेटायला आल्याचा निरोप पीएनी दिला.  त्यानंतर कराड यांनी त्याला आत बोलवले. लगेचच पीए पळत पळत आत आला आणि बाहेरील चारचाकी गाडी दोन व्यक्ती फोडत असल्याचे त्यानी सांगितले. मी बाहेर गेलाे तेव्हा सचिन झवेरी व संतोष सुरे या दोघांना मी प्रत्यक्ष गाडी फोडतांना पाहीले. असा दावा भागवत कराड यांनी केला आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच संतोष सुरे हा घरात आला. त्याच्यासोबत चार पाच लोकं होते. त्यांनी मला दमदाटी केली. पेपरला तनवाणी यांच्याविरोधात स्टेटमेंट का दिले. असे स्टेटमेंट द्याल तर यादराखा अशी धमकी दिल्याचे कराड यांनी सांगितले. हे सगळे किशनचंद तनवाणी यांचे समर्थक असल्याचेही कराड यांनी सांगितले.

या दमदाटीला आम्ही घाबरणार नाही
एक दिवसांपूर्वी एका दैनिकाच्या पत्रकाराने तनवाणी भाजप सोडून का गेले यावर माझी प्रतिक्रीया घेतली. तनवाणी भाजप सोडून गेल्यावर काय फरक पडला असा प्रश्न विचारल्यावर काहीही फरक पडला नाही असे मी सांगितेेले. त्यानंतर तनवाणी का गेले असे विचारले, याचे उत्तर मी सांगू शकत नाही असे कराड म्हणाले. मात्र, तेच मला म्हणाले की ‘ज्या प्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात’ असे झाले का असे मला पत्रकारानेच विचारले त्यावर ‘मला असेच वाटते’ असे कराड म्हणाले, त्यामुळे ‘सत्तेच्या ढेपेला लागलेला मुंगळा’ या मथळ्याची बातमी प्रसिध्द झाली. हा पब्लिसीटी स्टंट असून तनवाणी समर्थकांनीच हा हल्ला केला. या हल्याचा आम्ही निषेध करताे. या दमदाटीला आम्ही घाबरणार नाही असे ते म्हणाले यावेळी आ. अतुल सावे, नविन शहराध्यक्ष संजय केनेकर प्रमाेद राठोड आदिंची उपस्थिती होती.

Related Articles

Close