Today's Special

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन

१८ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : रविवार

सुर्योदय : ०६.२०

सुर्यास्त : १९.०४

नक्षत्र : पु. भाद्रपदा

तिथी : कृ. तृतीया

१८ ऑगस्ट दिनविशेष

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन

सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ – ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.

१८ ऑगस्ट – इतर दिनविशेष

२००८ : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
२००५ : ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात
१९९९ : कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले.
१९४२ : शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
१९२० : अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१८४१ : जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना
१९८० : प्रीती जंघियानी – अभिनेत्री
१९६७ : दलेर मेहंदी – भांगडा गायक
१९५६ : संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज
१९३६ : रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर
१९३४ : संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक
१९२३ : सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)
१९०० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)
१८८६ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)
१८७२ : ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)
१७३४ : रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)
१७०० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
२००८ : नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
१९७९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)
१९९८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)

Related Articles

Close