Today's Special

१७ ऑगस्ट- आज पारशी नूतनवर्षारंभ

१७ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : शनिवार(शुभ दिवस, परशी फरवर्दीन मासारंभ)

सुर्योदय : ०६.२०

सुर्यास्त : १९.०५

नक्षत्र : शततारका

तिथी : कृ. द्वितीया

१८ ऑगस्ट दिनविशेष

आज पारशी नूतनवर्षारंभ

पारशी धर्मीयांच्या नववर्षाचा आज पहिला दिवस आहे. नववर्ष निमित्तानं पारशी धर्मीय अग्यारीमध्ये जाऊन प्रार्थना करुन आशिर्वाद घेतात. पारशी समाजाच्या पारंपरिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो.

या दिवशी पारशी धर्मीय सरत्या वर्षातल्या कडूगोड आठवणी आणि कृत्यांचं स्मरण करतात. तसंच घडलेल्या चुकांबद्दल माफी मागतात. तर नवरोझ या पारशी वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि सकारात्मकतेनं पारशी धर्मीय शुभारंभ करतात.

इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ‘नवरोज’ म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे.

१७ ऑगस्ट – इतर दिनविशेष

१९९७ : उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर
१९८२ : पहिली सी. डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.
१९८८ : पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९५३ : नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
१८३६ : जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट’ ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
१६६६ : आग्र्याहून सुटका – शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतुन पसार झाले.
१९७२ : हबीब उल बशर – बांगला देशचा क्रिकेटपटू
१९७० : जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४९ : निनाद बेडेकर – इतिहास संशोधक
१९३२ : व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक
१९२६ : जिआंग झिमिन – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे मुख्य सचिव
१९१६ : डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)
१९०५ : शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)
१८९३ : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)
१८८८ : गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (१९१८), पुण्याचे महापौर (१९६२) (मृत्यू: ? ? ????)
१८६६ : मीर महबूब अली खान – हैदराबादचा सहावा निजाम (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)
१७६१ : पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (मृत्यू: ९ जून १८३४)
१९८८ : मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
१९०९ : भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

Related Articles

Close