Happenings
गुन्हे शाखेकडून कल्याण मटका चालवणारा ताब्यात
शहरात मिलींद मल्टीपर्पज शाळेच्या कॉर्नरवर रोडवर छावणी परीसरात गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह बुधारी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान छापा मारला. यावेळी दिपक परशुराम ढोले (५३, रा. अरब खिडकी, जयसिंगपुरा) हा इसम कल्याण मटका हा जुगार चालवतांना मिळून आला. त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आकडे टाकलेल्या १६ चिठ्ठ्या, पेन, १६ हजार ९१० रूपये रोख रक्कम, १० हजार रूपयांचा विवो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट असा एकूण २६ हजार ९१० रूपयांचा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून करण्यात आली. आरोपीस अधिक विचारपूस केली असता अरोपीने हकीम (रा. शहागंज) या इसमाच्या सांगण्यावरून कमिशनवर कल्याण मटका चालवतो असे सांगितले. त्यानुसार दोघांविरूध्द छावणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या इसमास पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन छावणी यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपआयुक्त मीना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे व गुन्हे शाखेचे पथक, पोहेकॉ. सैय्यद मुजीब अली, पोहेकॉ. तुकाराम राठोड, पोलीस नाईक गजानन मान्टे,पोलीस कॉन्स्टेबल भावसिंग चव्हाण , पोलीस कॉन्स्टेबल आनंद वाहूळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खरात यांनी केली आहे