Happenings
अधीक्षकांच्या परीक्षेत दोन पोलिस ठाणे नापास :
पाच पोलिस ठाण्यांची घेतली होती परिक्षा : तक्रार न नोंदवून घेणाऱ्या ठाण्याला पाच हजाराचा दंड
तरुणीची छेडछाडीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या खुलताबाद, वीरगाव ठाणे अंमलदाराला ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. तरूणीची छेडछाडीची तक्रार नोंदवून न घेता तिला ठाण्यातून पोलीसांच्या जीपमधून बसस्थानकात नेऊन गावी जाणाऱ्या बसमध्ये बसवून देण्याचा प्रताप खुलताबाद पोलीसांनी ११ डिसेंबर रोजी केला. तर मोबाईल चोरीची तक्रार न नोदंवताच फक्त अर्ज घेऊन तक्रारदाराला वीरगाव पोलीस ठाण्याच्या अंमलदाराने परत पाठवले. नागरीकांच्या तक्रारींना कसा प्रतिसाद मिळतो आहे, हे पाहण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीच हे परीक्षा तक्रारदार पाठवले होते. या परीक्षेत नापास झालेल्या खुलताबाद , वीरगावच्या अंमलदारांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
गुन्ह्याची संख्या कमी दाखवण्यासाठी तक्रारी दाबू नका. तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करणे हे पोलीसांचे काम आहे. असे स्पष्ट आदेश ग्रामीण भागतील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी कितपत होते हे पाहण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार समोर आलेल्या प्रकारातून संबंधीत अंमलदारांना दंड ठोठावण्यात आला.
गुन्ह्याची संख्या कमी दाखवण्याासाठी तक्रारी दाबू नका – पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील