Happenings

जिल्हा परिषदेत राडा, अध्यक्षांची निवड उद्यावर

जिल्हा परिषदेत निवडणुकीदरम्यान चांगलाच राडा झाला. परंतु पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार टळला. भाजपच्या सदस्या अग्रवाल या तीन वाजेच्या सुमारास आल्या असतांना त्यांना सभागृहात येऊ न दिल्याने राडा झाला.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मावळत्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगांवकर यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या मीना शेळके यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. डोणगांवकर यांच्या बंडामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवे वळण आले. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवयानी डोणगांवकर जेव्हा सभागृहात पती कृ़ष्णा पाटील डोणगांवकर यांच्या साेबत जात होत्या तेव्हा आमदार अंबादास दानवे आणि कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्यात वादावादी झाली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेत ज्या पक्षाचे सदस्य अधिक त्याचा अध्यक्ष असे धोरण ठरवण्यात आले होते. त्यानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १७ व काँग्रेसचे १६ सदस्य असतांना मंुबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतांना मात्र वेगळ्याच राजकीय घडामोडी समोर आल्या. प्रचंड गोंधळ झाल्याने प्रशासनाने बैठक तहकुब करून शनिवार (ता. ४) रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी बैठक ठेवली आहे. बैठक तहकुब केल्यानंतर श्रीमती डोणगावकर बाहेर पडतांना कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली होती. पोलिस कार्यकर्त्यांनी गाडीला रस्ता करून दिला.

Related Articles

Close