Happenings

एमजीएम ट्रस्टतर्फे एमजीएम विद्यापिठाची स्थापना

एमजीएमचे स्वयंअर्थसहाय्यीत पहिले विद्यापीठ

एमजीएम ट्रस्टतर्फे एमजीएम विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुधीर गव्हाणे आहेत तर कुलसचिवपदी आशिष गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम यंनी मंगळवार(दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.
एमजीएम विद्यापीठ मराठवाड्यातील हे पाचवे विद्यापीठ असले तरी स्वयंअर्थसहाय्यीत पहिलेच विद्यापीठ आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्त्य साधून विद्यापीठ ९ सप्टेंबर २०१९ पासून कार्यरत आहे. पहिल्याच वर्षी २५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हॉटेल मॅनेजमेंट, एम. ए. इंटरनॅशनल जर्नालिझम, फॅशन डिझाईन, फोटोग्राफी , फाईन आर्ट चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. २०२०-२१ वर्षात तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतील अशी योजना आहे. एमजीएमच्या औरंगाबाद, नांदेड, नवी मुंबई, नोएडा-नवी दिल्ली याठिकाणी ६७ संस्था, महाविद्यालये, रूग्णालये असून अध्यक्ष कमलकिशोर कदम आहेत. ट्रस्टमधील औरंगाबाद सिडको परिसरातील संस्था या विद्यापीठांतर्गत येतील.
यावेळी कुलगुरू डॉ. गव्हाणे म्हणाले की, मराठवाड्यात जे आभ्यासक्रम नाहीत ते दिले जातील. पारंपारीक शिक्षणापेक्षा वेगळे देतांना विद्यार्थी रोजगारक्षम घडवला जाई. कला , वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रात ऑनर्स पदवी असेल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आठ देशातील विद्यार्थ्यांची लवकरच परिषद घेण्यात येईल. यातून पहिल्या ३०० विद्यार्थी प्रवेश घेतील अशी अपेक्षा आहे. जेएनईसीचे विद्यार्थीही जगभरात आहेत. त्यांच्या कंपन्या आहेत. तेही सहकार्य करतील. माजी विद्यार्थ्यांकडून हाेतकरू विद्यार्थांना स्कॉलराशिप देण्यात येईल.
अध्ययन आणि अध्यपन पध्दतीत बदल करण्यात येणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या क्वालिटी मॅन्डेंट २०२२ नुसार लर्निंग आऊटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्कचा अवलंब केला जाईल. याशिवाय सेवा, प्रकल्प आणि संशोधनावर आधारित शिक्षण असेल. विशेष म्हणजे विद्यापिठातील प्रत्येक विद्यार्थ्याला गांधी विचार आभ्यासक्रम देण्यात येईल. विद्यार्थ्यांना ग्रामीण परिवर्तन कार्यक्रम देण्यात येईल. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त प्रताप बोराडे, विद्यापिठाचे नियंत्रक कर्नल डॉ. प्रदीपकुमार, अधिष्ठाता डाॅ. हरीरंग शिंदे, डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती.

नव्या विद्यापिठाता या संस्थांचा समावेश :

जेनईसी, इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रीसर्च, बायोटेक्नॉलॉजी, फॅशन डिझाईन, जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन, महागामी संगीत अकादमी, फाईन आर्ट, डॉ. जी. वाय. पाथ्रीकर, कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अॅण्ड आय टी., हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरींग टेक्नॉलॉजी, खादी अॅण्ड पैठणी रिसर्च सेंटर, स्पर्धा परीक्षा, एमजीएम क्रीडा विभाग या संस्थां आणि महाविद्यालये यांचा या विद्यापिठात समावेश असेल.

विद्यापिठाबद्दल विशेष असे :

– देश आणि विदेशातील विद्यार्थी शुल्क सारखेच
– गरीब आणि हुषार ५० विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप
– दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याासाठी प्रेरणा

Related Articles

Close