Breaking News

औरंगाबादमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानास सुरूवात

उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क

आज सकाळपासूनच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली. सकाळी सात वाजेपासूनच नागरीक आपलं आजचं आद्य कर्तव्य बजावतांना दिसले. महायुतीचे मध्य मतदारसंघातील उमेदवार प्रदिप जैस्वाल, पूर्व मतदारसंघातील भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
पावसाचे वातावरण असल्याने काही प्रमाणात मतदानावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. काही मतदान केंद्रांजवळ पावसाने चिखल साचल्याने अपंग, वयोवृध्द मतदारांना मतदानास जाणे अवघड झाले आहे. तरी नागरीकांमध्ये मतदान करण्यास उत्साह िदसून येत आहे.

पश्चिममध्ये 4.3% मतदान
पश्चिम मध्ये 4.3 % मतदान सकाळी नऊ पर्यंत झाले आहे. काल सायंकाळी चार वाजेपासून सर्व अधिकारी कर्मचारी आपापल्या केंद्रावर उपस्थित आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीच्या यंत्र प्रत्यक्षिकामध्ये एकूण नऊ मतदान केंद्रातील यंत्रात तांत्रिक बिघाड निदर्शनास आले त्यावर लगेच उपाय योजना करून वेळेवर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे अशी माहिती पश्चिमच्या प्रमुख अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.

Related Articles

Close