Breaking News
औरंगाबादवर भाजप-सेनेचे निर्विवाद वर्चस्व
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यावर भाजप-शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून नऊ मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. नऊपैकी सहा मतदारसंघात शिवसेना तर तीन मतदार संघात भाजप विजयी झाली आहे.
औरंगाबाद मध्य – प्रदीप जैस्वाल (शिवसेना), औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट (शिवसेना), औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजपा), सिल्लोड – अब्दुल सत्तार (शिवसेना), कन्नड- उदयसिंग राजपूत (शिवसेना), पैठण- संदीपान भुमरे (शिवसेना), गंगापूर – प्रशांत बंब (भाजपा), फ़ुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा), वैजापूर- रमेश बोरनारे (शिवसेना) यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.
असे असतानाही राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतील दिग्गजांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. तर काही मंत्रीदेखील पराभूत झाले आहेत.