In Short

निशांत फाउंडेशनच्या अनाथ मुलामुलींसाठी दिवाळी भेट

कम्युनिटी पोलिसींग अंतर्गत पोलिस स्टेशन हडको यांच्यातर्फे दिली भेट

कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या सकल्पनेतून पोलिस उपायुक्त राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ सिडको विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या वतीने मंगळवार(दि.२२) रोजी निशंात फाऊंडेशनच्या विद्यादिप बालिकाश्रम छावणी गजानन बालसदन येथील मुलांसाठी किराणा सामान वाटपाचा व दिवाळी भेट म्हणून उमंग सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास पगारीया ऑटोचे संचालक पुखराजजी पगारीया, संदिप आटोळे, डॉ. संजय साळूंखे, सादीक बागवान, धिरज देशमुख, कल्याण जाधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम आयोजनासाठी विद्यादीप बालिकाश्रमाचे वैभव घुले, प्रशांत कांबळे, गौरव पाटील, सिस्टर व्हेंसीनटीना कास्टा यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी पोलिस हवलदार दादासाहेब सातपुते, गोकुळसिंग लोदवाल व पोलिस नाईक राजेंद्र तरटे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Close