Happenings
उद्योग आले तर रोजगार मिळतील आणि गरिबी हटेल : नितीन गडकरी
देशातील गरीबी हटवण्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक आहे. उद्योग आले तर रोजगार मिळतील आणि गरीबी हटेल असे समीकरणे आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना सक्षम व्हावे लागेल. सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ९ जानेवारी पासून सुरू झालेल्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो -२०२० चा समारोप रविवार १२ जानेवारी रोजी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, अतिरीक्त सचिव राममोहन मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. एवढे मोठे औद्याेगिक प्रदर्शन भरवल्याबद्दल मसिआच्या टिमचे गडकरी यांनी अभिनंदन केले.
यावेळी प्रदर्शनाच्या आयोजनात असणाऱ्या उद्योजकांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनिल किर्दक यांनी केले तर मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे यांनी संघटनेतर्फे मनोगत व्यक्त केले. निता पानसरे यांनी सुत्रसंचालन केले.
यावेळी प्रदर्शनाच्या आयोजनात असणाऱ्या उद्योजकांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनिल किर्दक यांनी केले तर मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे यांनी संघटनेतर्फे मनोगत व्यक्त केले. निता पानसरे यांनी सुत्रसंचालन केले.
आजच्या अपयशात उद्याचे यश असते
उद्योजक घडण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या देशात व्यवस्थापनाचे इन्स्टीट्युट आहे, आर्थिक व्यवस्थापनाचे इन्स्टीट्युट आहे. मात्र उद्योजक घडवण्यावर आता काम करावे लागेल. ही जवाबदारी यश मिळवलेल्या उद्योजकांकडे आहे. त्यांच्या पुढकारामुळेच देश बदलु शकेल. सगळ्या यशस्वी उद्योगाकंनी चढ उतार पाहीले. त्यांचे आयुष्य समजून घेतले तर उद्योजक कसा घडतो हे कळते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात. आजच्या अपयशात उद्याचे यश असते हे लक्षात ठेवा असे गडकरी म्हणाले. समस्यांचे रुपांतर जो संधीत करतो तोच उद्योजक आहे