Happenings

मला साप म्हणणारे शिवसेनेचे नेते कधीच माझ्या विचारांशी स्पर्धा करु शकत नाही- बॅरीस्टर असदोद्दीन ओवेसी

प्रचारसभेत ते बोलत होते

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा झेंडा काढून टाका असे आवाहन केले. मात्र मी या ठिकाणी असलेल्या तरुणांच्या मनात झेंडा लावला आहे. तो कोणीच काढू शकत नाही. मला साप म्हणणारे शिवसेनेचे नेते कधीच माझ्या विचारांशी स्पर्धा करु शकत नाही असा निशाणा असदोद्दीन ओवेसींनी ठाकरेंवर साधला. एमआयएमचे सर्वेसर्वा बॅरीस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी मध्यचे एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दकी यांच्या प्रचारासाठी पैठण गेट येथील पार्कींगच्या मोकळ्या जागी गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता सभा घेतली. त्या सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व, पश्चिम आणि मतदार  संघातून उमेदवाराची  निवड करणे ही माझ्यासाठी परिक्षा होती. अनेक लोक उमेदवारासाठी लायक होते. मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांचा नक्की विचार होईल.  त्यांनी मजलिसवर नाराज होवू नये. अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली.

माझ्या निर्णयामुळे कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय होवू नये

माझ्यावर जी जवाबदारी आहे त्यामुळे झुकलो आहे. नेहमी भिती वाटते माझ्या निर्णयामुळे कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय होवू नये. कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही कायम काळजी घेवू. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी ही संधी सिद्ध करावी, ज्यांना मिळाली नाही ते माझ्या अगदी जवळ आहेत. हे उमेदवार ज्या रस्त्यावर निघाले आहेत तो काट्याचा रस्ता आहे. जनतेंनी यांना साथ द्यावी असे भावनिक आवाहन यावेळी असदोद्दिन यांनी नागरीकांना केले. आठ दिवसांपूर्वी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दकी यांना पैठण गेट येथे धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच ठिकाणी  ही सभा घेण्यात आली.

तु फक्त आमदार आहे, तुझे २४ तास जनतेचे

माझ्या वडीलांकडूल मी राजकारण शिकलो. तेव्हा माझ्या वडीलांनी २५ वर्षांपूर्वी विचारले तू तयार आहेस का?  तेव्हा मी नेमके काय आहे. या बाबत विचारले तेव्हा वडील म्हणाले आता तू फक्त आमदार आहे. तुझे २४ तास हे जनतेचे आहे. त्यासाठी तू तयार आहेस का?  तेव्हा पासून सुरु झालेला हा प्रवास आजही कायम आहे. असेच काम ज्यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रतिनिधीत्व मिळाले त्यांनी करावे असे आवाहन ही ओवेसी यांनी केले.
यावेळी उमेदवार नासेर सिद्दकी, आयुब जहागिरदार, हैदराबादाचे आमदार पाशा कादरी , नगरसेवक आबू सलाम, अॅड खिजर पटेल, जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, अज्जू नाईकवाडे, प्रभाकर पारधे,  मौलाना मेहफुलउल रहेमान, गंगाधर ढगे,  फिरोज खान यांच्या सहएमआयएमचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन प्रा. सोहेल झकीयोद्दीन यांनी केले.

Related Articles

Close