Happenings

कलापथकाद्वारे जिल्ह्यात मतदान करण्यासाठी जनजागृतीला सुरूवात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होत आहे. यादिवशी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कलापथकाद्वारे तीन दिवस जनजागृती करण्यात येत आहे.

शासनाच्या 20 डिसेंबर 2018 रोजीच्या निर्णयानुसार जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सहा कलापथकांची निवड करण्यात आली. या पथकद्वारे 16, 17 आणि 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. पथकामध्ये औरंगाबादच्या श्री.खंडेराय कला मंडलम्, आभा कला मंच, लोकजागृती बहुद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था, शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, लोकरंजन लोककला प्रतिष्ठान, जनसेवा कला पथक प्रतिष्ठान या कलापथकांचा समावेश आहे.

या पथकांमधील श्री.खंडेराय कला मंडलम् यांच्यावतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय, गुलमंडी, क्रांती चौक, कॅनॉट प्लेस, सिडको व मुख्य बस स्थानक, टी.व्ही. सेंटर, घाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मनपा चौक या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. आभा कला मंचाच्यावतीने पैठण येथील तहसील कार्यालय, मुख्य चौक, पाचोड, कचनेर, पिंपरी (खु.), बिडकीन, मुधलवाडी, फारोळा, ब्रम्हगाव आणि लायगाव येथे जनजागृती होईल.

गंगापूर येथे तहसील कार्यालय, मुख्य चौक, रांजणगाव, डोणगाव, लासूर स्टेशन, तुर्काबाद, वाळूज, खुलताबाद, वेरूळ आणि हर्सुल याठिकाणी लोकजागृती बहुद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था यांच्यावतीने कलापथकाचे सादरीकरण करण्यात येईल. फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्ये शिवदर्शन सांस्कृतिक शहिरी संच यांच्याकडून फुलंब्री तहसील, पिसादेवी, मुकुंदवाडी, राम नगर, रामवाडी, गणोरी, गाढे जळगाव, चिखलठाणा,‍ शिरोडी आणि उमरावती याठिकाणी कलापथक जनजागृती करतील.  सिल्लोड, सोयगाव तहसील, सिल्लोड मुख्य चौक, धोत्र, भवन, पानवडोद (खु.), वडोद चाथा, बोरगाव बाजार, पिंपळवाडी, फर्दापूर याठिकाणी लोकरंजन लोककला प्रतिष्ठान जागृती करतील. तर जनसेवा कला पथक प्रतिष्ठानच्यावतीने वैजापूर तहसील कार्यालय, शिऊर, माळी घोगरगाव, सिद्धनाथ वाडगाव, डवाळा, वाहेगाव, बोलठाण, आघूर, हैबतपूर आणि नेवरगाव याठिकाणी मतदान करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

Related Articles

Close