Features

मंदीतही प्रोझोनची चांदी, ६ महिन्यात विकली ट्रेड सेंटरमधील ७५ टक्के जागा, ३०० नवीन रोजगार

चार मजली सेंटरमध्ये २ लाख चौरस फूट जागा, १.५९ लाख चौ.फूट विकली

देशभरात मंदीचे संकट गहिवरले आहे. वाहन आणि बांधकाम क्षेत्राचे तर मंदीमुळे कंबरडे मोडले आहे. मात्र, मंदीतही औरंगाबादच्या प्रोझोन मॉलची चांदी सुरू आहे. येथे नव्याने तयार झालेल्या प्राेझोन ट्रेड सेंटरमधील ७५ टक्क्याहून अधिक जागेची अवघ्या ६ महिन्यात विक्री झाली आहे. यात ८ उद्योगांनी कार्यालये थाटली असून दिवाळीत आणखी १० कार्यालये सुरू होणार आहे. मंदीमुळे नैराश्य पसरलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. तर मंदीमुळे रोजगार कमी होत असतांना ट्रेड सेेंटरमध्ये ३०० नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

औरंगाबाद येथील प्रोझोन इंटू मॉलला २०११ मध्ये सुरूवात झाली. खरेदी, करमणूक, खाद्य आणि निवांतपणाचे काही क्षण घालवण्याची चंगळ असणाऱ्या प्रोझोनने कॉर्पाेरेट समूहांसाठी खास प्रोझोन ट्रेड सेंटर सुरू केले आहे. आजघडीला विविध उद्योगांची कार्यालये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. ती एका ठिकाणी असावीत, या उद्देशाने प्रोझोन ट्रेड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांनी दिली.

चार मजल्यावर कार्यालये
शक्यताे मॉल बहुमजली असतात. परंतू १० लाख चौरस फुटावर आडव्या समांतर पद्धतीने विकसीत करण्यात आलेला प्रोझोन हा देशातील सर्वाधिक मोठा मॉल आहे. मॉलला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर यावर ट्रेड सेंटरसाठी चार मजले बांधण्यात आले. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येथील जागा विकण्यास सुरूवात झाली. अवघ्या ६ महिन्यात २ लाख चौरस फुटापैकी १ लाख ५९ हजार चौरस फुटाची जागा विकली गेली आहे. यापैकी १५ हजार चौरस फुटावर राजूरी स्टील, अभिषेक अॅड, एअरॉक्स टेक्नॉलॉजी आदी ८ कार्यालये सुरू झाली आहेत. उरलेल्या जागेवर दिवाळीपूर्वी आणखी १० कार्यालये सुरू होणार आहेत. यात एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीचा समावेश असेल. २५० ते ४००० चौरस फुट आकाराची ही कार्यालये आहेत. ट्रेड सेंटरमध्ये अट्रीयम, सीसीटीव्ही, कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरीया, जीम या सुविधा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३०० जणांना रोजगार मिळाला आहे, असे मोहम्मद अर्शद म्हणाले.

मंदीतही जागेला प्रतिसाद
प्रोझोनमध्ये आपले कार्यालय असावे, असे प्रत्येक उद्योजक, व्यावसायीकाचे स्वप्न असते. त्यादृष्टीने सर्व सुविधांयुक्त ट्रेड सेंटरची आम्ही निर्मिती केली आहे. ती विकत घेण्यासाठी आमच्याकडे रांगा लागल्या. मंदीतही अल्पावधीतच ७५ टक्के जागा विकली गेली. अनेकांनी कार्यालये थाटली आहे. यातून अनेक जणांना रोजगार मिळाला आहे. औरंगाबादच्या प्रगतीसाठी ट्रेड सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल.-मोहम्मद अर्शद, सेंटर हेड, प्रोझोन इंटू

Related Articles

Close