Breaking News
मराठा क्रांती मोर्चा औरंगाबाद जिल्हा संघटनेकडून उद्या महाराष्ट्र बंद चे आवाहन.
शाळा, महाविद्यालये उद्या बंद
मराठा क्रांती मोर्चा औरंगाबाद जिल्हा संघटनेकडून दिनांक ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोणतीही अनुचित घटना होऊ नये याची दक्षता म्हणून दिनांक ९ ऑगस्ट रोजी एक दिवसाकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत. त्या अनुषंगाने औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या स्तरावर दि.९ ऑगस्ट रोजी एक दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश तातडीने निर्गमित करुन अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आज जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे