Visit Our Website
Today's Special

९ ऑगस्ट – आज क्रांती दिन.

९ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : गुरूवार (गुरूपुष्यामृत याेग उ. रात्री ०५.४३ वाजे पासून दि. १० ऑगस्टच्या सुर्योदयापर्यंत)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१८

सुर्यास्त : १९.१०

नक्षत्र : अर्द्रा, पुनर्वसु

तिथी : कृ. त्रयोदशी

९ ऑगस्ट दिनविशेष.

९ ऑगस्ट १९४२ आज क्रांती दिन.

देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन. भारत छोडो आंदोलन खरोखरच एक सामुदायिक चळवळ होते ज्यात लाखो सामान्य हिंदुस्तानी सहभागी झाले होते. या चळवळीने मोठ्या संख्येने युवकांना स्वतःकडे आकर्षित केले. त्याने आपली महाविद्यालय सोडले आणि तुरुंगात मार्ग घेतला. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाभूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो.

९ ऑगस्ट इतर काही दिनविशेष

२००० : भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर
१९९३ : छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९७५ : पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
१९६५ : मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९४५ : अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.
१९२५ : भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा
११७३ : पिसाच्या मनोर्या्चे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
१९२० : कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्याध, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ? ? ????)
१९०९ : डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मतयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)
१८९० : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ’हाच मुलाचा बाप’, ’सन्याशाच्या मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ’सौभद्र’, ’शारदा’, ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close