Visit Our Website
Today's Special

११ आॅगस्ट – क्रांतिकारक खुदिराम बोस यांची आज पुण्यतिथी.

११ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : मंगळवार (दर्श अमवस्या, दिपपूजा, अमवस्या समाप्ती दुपारी ३.३८)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१८

सुर्यास्त : १९.०९

नक्षत्र : अश्लेशा

तिथी : अमवस्या

११ ऑगस्ट  दिनविशेष

१९०८ : क्रांतिकारक खुदिराम बोस  यांची आज पुण्यतिथी. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

खुदीराम बोस : भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले.

बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणा-यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणा-या  न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले.

यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बाँब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडला गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९० या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतिकारक ठरला.

११ ऑगस्ट- इतर काही दिनविशेष.

२०१३ : डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
१९९९ : बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.
१९९९ : शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
१९९४ : अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना ’विश्वगुर्जरी पुरस्कार’ जाहीर
१९८७ : ’युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह’च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.
१९७९ : गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
१९६१ : दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.१९६० : चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५२ : हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.
१९४३ : सी. डी. देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
१८७७ : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
२००० : पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
१९९९ : रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (जन्म: ३१ आक्टोबर १९४६)
१९७० : इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close