Visit Our Website
Breaking News

सनातन संस्थेचा साधक म्हणून अटक केलेला शरद कळसकर मुळ दौलताबादचा.

मुंबईतील नालासोपारा भागातून सनातन संस्थेचा साधक म्हणून अटक केलेला शरद कळसकर (२५) हा मुळ अौरंगाबाद जवळील दौलताबाद किल्याच्या पायथ्याशी असणारे केसापुरी या गावातील आहे. हे गाव फक्त ५० घरांचे आहे. चार वर्षापूर्वी कोल्हापूरला नोकरीसाठी जातो असे सांगून शरद गेला होता. मधून मधून घरी येत होता. दर आठवड्याला फोनवरही बोलत होता. मात्र काल अचानक फोन आला की तुमच्या मुलाला एटिएसने अटक केली आहे. त्याचा नेमका दोष काय हे अजून कळालेले नाही. टिव्हीवर जेवढे पाहीले तेवढीच आम्हाला माहीती मिळाल्याचे त्याच्या कुुुंटुबियांनी सांगितले. या बाबत औरंगाबाद एटिएसने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दौलताबाद पोलिस ठाण्यात देखील या बाबत काहीही नोंद नाही. त्याच्या केसापूरी गावात अजून कोणी अधिकारी चौकशीसाठी देखील आले नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना आल्या नसल्याची माहीती दौलताबाद पोलिसांनी दिली. संनातन संस्था तसेच हिंदुत्ववादी सघंटनाशी संबंधित असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्या गोंधळेकर (३९) या तिघांना एटीएस पथकाने अटक केली असून. या तिघांनाही १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे. त्यानंतरच शरदचा काय सहभाग होता हे स्पष्ट होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close