Breaking News
मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन
'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या निषेधार्थ आंदोलन
पुंडलिकनगर येथे ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा तीव्र निषेध करून मराठा क्रांती मोर्चा तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाेबत तुलना करून अवमान करतण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची कोणी बरोबरी करू शकत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून खोडसळपणा करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या माध्यमातून अपमान करणे आणि समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणामागे राजकारण असून याची चौकशी झाली पाहिजे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि गोयल यांच्या पुतळ्याचे दहन केले. पुस्तकावर तातडीने बंदी घातली पाहीजे, पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चातर्फे गोयल यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. तसेच भाजप नेते, गोयल यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश केरे, रविंद्र काळे, अशोक मोरे, किरण काळे, शुभम केरे, धनंजय देशमुख , राहुल मुदगल, संकेत शेटे यांनी केली अाहे.