In ShortUncategorized

शिवसेनेच्या वतीने संभाजीनगर मध्ये महिलांसाठी “प्रथम ती – महिला संमेलन” आयोजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महिलांच्या हक्कासाठी उभे राहण्याच्या आणि त्यांना समान संधी देऊन स्वावलंबी करण्याच्या विचारावर आधारित शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “प्रथम ती – महिला संमेलन”आयोजित करण्यात आले आहे शिवसेना संभाजीनगर जिल्ह्यात  १० सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी ३:३० वाजता पाटीदार भवन जालना रोड संभाजीनगर* या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे *शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे
महिलांना प्रथम स्थान देणारे तसेच सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण – सुरक्षा – समता – स्वास्थ्य – स्वावलंबन या पंचसूत्री वर लक्ष केंद्रित करणारे “प्रथम ती – महिला संमेलन” स्त्रीकेंद्रित संमेलन असून या महिला संमेलनात सौ. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उपनेत्या) ,सौ कामिनी शेवाळे (मा. नगरसेविका),सौ. दीपा पाटील (उप विभाग संघटक), सौ. तेजस्विनी घोसाळकर(नगरसेविका), सौ. संध्या डोशी(प्रभाग समिती अध्यक्ष,नगरसेविका)या शिवसेनेच्या नेत्या सहभागी असणार आहे व यांचे मार्गदर्शन लाभणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातील महिला माता-भगिनी युवती यांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना संभाजीनगर च्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Close