Today's Special

२३ ऑगस्ट- आज श्रीकृष्ण जयंती

२३ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : शुक्रवार(सौर शरद ऋतु प्रारंभ)

सुर्योदय : ०६.२१

सुर्यास्त : १९.०१

नक्षत्र : कृतिका

तिथी : कृ. सप्तमी

आज श्रीकृष्ण जयंती

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

`गोकुळाष्टमी’ या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

उत्सव साजरा करण्याची पद्धत

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात

२३ ऑगस्ट – इतर दिनविशेष

२०१२ : राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!
२०११ : लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.
२००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
१९९७ : हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९० : आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९६६ : ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू
१९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८३९ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९७३ : मलाईका अरोरा – खान – मॉडेल व अभिनेत्री
१९५१ : नूर – जॉर्डनची राणी
१९४४ : सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
१९१८ : गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.
१७५४ : लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)
१९९४ : आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)
१९७५ : पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. (जन्म: २२ जुलै १८९८)
१९७४ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)
१९७१ : रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१८०६ : चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६)
६३४ : अबू बकर – अरब खलिफा (जन्म: ? ? ५७३)

Related Articles

Close