In Short

पुढील चार दिवस तुरळक पावसाचा अंदाज

पूर्वोत्तर भागात झालेल्या हिमवृष्टीचा परीणाम महाराष्ट्रात जाणवत असून मराठवड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरीक मात्र थंडीच्या दिवसात पाऊस पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक बदल झाला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४ ते ५ अंश सेल्सिअसने चढला होता. दिवसाचे तापमान २७ वरून २४ अंश सेल्सिअसवर आले. तर रात्रीचे कमाल तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसवर राहीले. बिहार आणि पूर्वेकडील काही राज्यात पाऊस आणि दाट धुक्याचा परिणाम मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाणवत आहे. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. आजही सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी दाट धुके पडले होते. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २७ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरणार आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज आहे. हवामानाच्या या बदलाचा फटका नाताळाचा आनंद लुटणाऱ्या नागरीकांवर झाला आहे. पर्यटनाला निघालेल्या अनेकांचा यामुळे हिरमोड झाला.

Related Articles

Close