Happenings
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदिप जैस्वाल यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्या आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादाीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे (३४, रा. बेगमपुरा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच तक्रारीत पुढे म्हटले आहे की, शिवसेनेची भाजपसोबत युती होती. ते एकत्र निवडणूक लढले होते, मात्र निवडणुक निकालानंतर ही युती सत्तेच्या वाटपावरून तुटली आहे. या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळूनही यांनी सत्ता स्थापन केलेले नाही. महायुतीच्या नावाखाली शिवसेनेने मते मिळवली आणि आता सत्तेच्या लालसेपोटी सेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जात अाहे.
विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार प्रदील जैस्वाल, चंद्रकांत खैरे आणि पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान औंरगाबाद मध्ये प्रचार करून हिंदुत्वाचे रक्षण करण्याकरता शिवसेना भाजप महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आम्ही त्यांच्या आवाहनाला फसून व त्यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला मतदान केले होते. पंरतु त्यांनी युतीचे सरकार स्थापन न करता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला असल्याने ही तक्रार दाखल करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.