Happenings

मुंबईत होणाऱ्या महाअधिवेषनासाठी जिल्ह्यातील १३०० मनसैनिक जाणार

मनसेच्या स्थापनेच्या १३ वर्षानंतर पक्षाने राज्यस्तरीय अधिवेषनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी २३ जानेवारी रेाजी मुंबईत गोरेगाव येथे नेस्को सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातून सुमारे १३०० पदाधिकारी या अधिवेषनासाठी जाणार आहे. अशी माहीती मंगळवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राज्यभरातील शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित असणार आहे.
या ठिकाणी पक्षाध्यक्ष राज ठाकरे नव्या झेंड्यासह पक्षातील बदललेले धोरणे जाहीर करतील. या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक मनसेच्या पदाधिकाऱ्याला आयकार्ड देण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या बैठका सुरु रहाणार आहेत. अशी माहीती जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली. अधिवेषनाच्या पूर्वीच राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या सूचना इमेलआयडीवर मागवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर राज्यभरात इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होईल. अशी माहीती यावेळी देण्यात आली. शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, चित्रपटसेनेचे आशिष सुरडकर, गजनगौडा पाटील, अब्दुल रशीद, राजू जावळेकर, मंगेश साळवे यांची यावेळी उपस्थिती होती.

Related Articles

Close