Happenings

बनावट कागद पत्राच्या आधारे जमिन विक्री करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

दुय्यम निबंधकासह सात जणांविरुध्द गुन्हा

दोन एकर जमिनीची बनावट कागदपत्रे आणि इसमांच्या आधारे दुय्यम निबंधकासह सात जणांनी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, हरियाणा राज्यातील हरिष कौसिक ओमप्रकाश कौसिक (वय ३८, रा. भगतसिंग कॉलनी, वल्लभगड, फरिदाबाद) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची चिकलठाणा परिसरातील घारदोन तांडा येथे दोन एकर जमीन आहे. ही जमीन बळकावून तिची परस्पर विक्री करण्यासाठी सात जणांनी कट रचून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे १८ जुन २०१४ रोजी सातही जणांनी बनावट व्यक्ति उभे करुन दुय्यम निबंधकाला हाताशी धरत जमिनीची परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यावर कौसिक यांनी जमिनीची कागदपत्रे जमा केली. त्यानंतर गुरुवारी सिटीचौक पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली आहे. याप्रकरणी संपत हिरामन राठोड, गोवर्धन मानसिंग चव्हाण (दोघेही रा. घारदोन तांडा), रविंद्र नामदेव हिवराळे (रा. गारखेडा परिसर) यांच्यासह प्रत्येकी दोन महिला, अज्ञात दोघे व तत्कालीन दुय्यम निबंधकाविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत

Related Articles

Close